बातम्या

लुटारू वधुवर सुचकांना आवर घालण्यासाठी एस पी ना निवेदन

SPs statement to stop tipsters on bride robbers


By nisha patil - 12/19/2023 10:47:32 PM
Share This News:



लुटारू वधुवर सुचकांना आवर घालण्यासाठी एस पी ना निवेदन

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील फसव्या बोगस लुटारू वधू वर सूचक केंद्राची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने  जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत याची भेट घेतली.यावेळी कारवाइच्या मागणीचे  निवेदन सावंत याना देण्यात आलं.

विवाह इच्छुक तरुण, तरुणी आणि त्यांचे पालक यांची अलीकडे अनेक बोगस वधू वर सूचक मंडळकडून आर्थिक लूट केली जातेय. विवाह इच्छुक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांकडून ऑन लाईन पद्धतीने नोंदणी करण्याच्या नावाखाली भरमसाठ पैशाची मागणी केली जाते. मात्र नोंदणी केल्यानंतर बोगस स्थळ सुचवून फसवणूक केली जाते . काही वेळा नोंदणी करून घेतल्यानंतर संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. काही दिवसातच अशा संस्था कार्यालय बंद करून पोबारा  करत आहेत शहरासह जिल्ह्यात अनेक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झालीय.

मात्र सामाजिक प्रतिष्ठापायी अशी असे लोक तक्रार करत नाहीत याचाच गैरफायदा घेऊन दिवसेंदिवस बोगस वधुवर सुचक केंद्रांची संख्या वाढत आहे. यामधून मोठी आर्थिक लुबाडून केली जात आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे वधू वर सूचक केंद्र चालवणाऱ्या मंडळींना नाहक त्रास होत आहे. पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन बोगस वधू वर सूचक केंद्रांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेतली. यावेळी मनसेच्या वतीने कारवाईच्या मागणीचे निवेदन देखील सावंत यांना देण्यात आले. बोगस वधुवर सुचक केंद्रांच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर समन्वयक सुनील सामंत यांनी  दिला. यावेळी महिला संघटक मनीषा घाटगे दिशा मांडवकर राहुल पाटील विशाल कांबळे महेश कदम राहुल नाईक प्रसन्न वरखेडकर यांच्यासह संमुख झालेली उपस्थित होते.


लुटारू वधुवर सुचकांना आवर घालण्यासाठी एस पी ना निवेदन