बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी महामंडळाला फटका

ST Corporation hit by code of conduct for Lok Sabha elections


By nisha patil - 3/25/2024 7:37:28 PM
Share This News:



केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला पत्रकार परिषद देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यापासून देशभरात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. या काळात आता सरकारला कोणतेही नवे धोरणात्मक निर्णय, प्रकल्पांची घोषणा किंवा भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. परिणामी आचारसंहितेच्या काळात प्रशासकीय निर्णय आणि नवी विकासकामे हाती घेण्याची  पक्रिया जवळपास ठप्प होते. महाराष्ट्रातही याच कारणामुळे एसटी महामंडळाला  मोठा फटका बसला आहे.
 

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात मंजूर केलेली 900 कोटी रुपयांची रक्कम एसटी महामंडळाला मिळालीच नसल्याची माहिती समोर आले आहे. या 900 कोटी रुपयांच्या निधीचा वापर करुन एसटी महामंडळाकडून 2200 नव्या बसगाड्यांची खरेदी केली जाणार होती. मात्र, देशभरात लागू झालेली आचारसंहिता आणि राज्य सरकारच्यापायी प्रवाशांना जुन्याच गाड्यांनीच प्रवास करावा लागणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी महामंडळाला फटका