बातम्या
एका राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 14 मार्गांवर एसटी वाहतूक बंद
By nisha patil - 7/24/2023 4:42:29 PM
Share This News:
एका राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 14 मार्गांवर एसटी वाहतूक बंद
गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 39.8 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद चंदगडमध्ये 87.5 मिलिमीटर इतकी झाली. दरम्यान आज सकाळी 11 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोगावती नदीवरील बालिंगा पूल जुना आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने निर्णय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील 9 मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे 29 मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे. वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेकडेकडील एकूण 201 मार्गांपैकी 12 मार्ग बंद आहेत. ग्रामीणमधील 1997 मार्गांपैकी 18 मार्ग बंद आहेत. त्यामुळे 2198 मार्गांपैकी 30 मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे.
एका राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 14 मार्गांवर एसटी वाहतूक बंद
|