बातम्या

सचिन तेंडुलकर हॅफलेच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी

Sachin Tendulkar as brand ambassador of Hafley


By nisha patil - 4/24/2024 5:12:47 PM
Share This News:



जागतिक आघाडीवर असलेल्या हॅफलेने आपल्या भारतीय उपकंपनीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. ही भागीदारी म्हणजे अचूकता, गुणवत्ता आणि मूल्यांप्रति कटिबद्धतेचा वारसा असलेल्या या दोघांचे एकत्र येणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि दोन दशकाहून अधिक कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणारे, तेंडुलकर हे उत्कृष्टता, निष्ठा आणि अथक प्रयत्नांच्या परिपूर्णतेचे प्रतीक आहेत - हीच मूल्ये हॅफले शी समरस होणारी आहेत. ब्रँडचे उद्दिष्ट मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी,मुल्य वाढण्यासाठी आणि हॅफलेच्या अत्याधुनिक इंटिरियर सोल्युशन्ससह ग्राहकांना त्यांच्या जागा अधिक सुशोभित करण्यास प्रेरित करण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकर हॅफले बरोबर सहकार्य करतील.
 

हॅफलेच्या दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक फ्रँक श्‍लोडर म्हणाले की,सचिन तेंडुलकर यांची पाककलेप्रती असलेली आवड लक्षात घेता आमच्या ब्रँडसाठी ते अगदी योग्य आहेत असा आम्हाला विश्‍वास आहे. आमच्या समकालीन इंटिरियर सोल्युशन्सना ग्राहकांसमोर आणण्यासाठी तसेच कार्यक्षमता,आधुनिक तंत्रज्ञान आणि वर्धित सौंदर्यशास्त्र अधोरेखित करण्यासाठी ते सुयोग्य आहेत. याशिवाय त्यांची चिकाटी आणि तपशीलाकडे बारकाईने लक्ष देणे हे आमच्या ब्रँडच्या मुल्यांशी पूर्णपणे जुळते.
 

सचिनबरोबर जोडले जात असताना प्रेरणा आणि अभिनवतेचा प्रवास सुरू करण्यास आणि लोकांना मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस ची जाणिव करून देण्यास आणि त्या सुधारण्याच्या पध्दतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
 

आपला उत्साह व्यक्त करताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, हॅफलेसोबत भागीदारी करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मला पाककलेची आवड आहे आणि एक चांगले स्वयंपाक घर हे प्रत्येक कुटुंबाला आनंद देत असते.तरूण भारतीय त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होण्याची आकांक्षा बाळगून,नाविन्यपूर्ण आणि आधुनिक उपाय शोधत असतात.हॅफलेच्या डिझाईन सेंटरला भेट देताना मला हे वास्तविक पाहायला मिळाले. मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाने मला आकर्षित केले आहे आणि एसआरटी स्पोर्टस् मॅनेजमेट आणि हॅफलेमधील टीम्सना शुभेच्छा देतो. आम्ही आमच्या उद्दिष्टांसाठी सहकार्याने काम करत राहू.
 

हॅफले आणि सचिन तेंडुलकर यांच्या भागीदारीमुळे एका अतुलनीय प्रवासाची सुरूवात झाली आहे. एकत्रितपणे आम्ही आमच्या ग्राहकांना केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारी घरे तयार करण्यास प्रोत्साहित करून प्रेरित करण्यास उत्सुक आहोत.


सचिन तेंडुलकर हॅफलेच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी