विशेष बातम्या

सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळत सचिनने साजरा केला वाढदिवस

Sachin Tendulkar celebrated his birthday by playing cricket on the beach in Sindhudurga


By nisha patil -
Share This News:



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल वयाचं अर्धशतक पूर्ण केलं. सचिनने आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या  हॉटेलमध्ये साजरा केला. महत्त्वाचं म्हणजे सचिनने कोणत्याही आलिशान जागेवर किंवा डेस्टीनेशनवर वाढदिवस साजरा न करता साधेपणाने कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर साजरा केला.  आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात दाखल झाला. सचिनने आपला वाढदिवस भोगवे समुद्रकिनारी असलेल्या साध्या हॉटेलमध्ये साजरा केला. या हॉटेलचं नाव, कोकोश्यामबाला.. याच कोकोश्यामबालामध्ये त्याने मुक्काम केला. या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसंच क्रिकेटपटूही येऊन गेले आहेत. तर सचिनने पहिल्यांदाच आपला वाढदिवस निसर्गरम्य सिंधुदुर्गात साजरा केला. काल सचिन मित्र आणि कुटुंबीयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आणि तिथे जाऊन त्याने ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे किनारी फेरफटका मारला. यावेळी भोगवे किनारी असलेल्या पर्यटकांच्या इच्छेला मान देत त्याने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो काढता आल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याचसोबत परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर आणि सचिनच्या मित्रांनी भेट दिली.


Sachin Tendulkar celebrated his birthday by playing cricket on the beach in Sindhudurga