बातम्या

अनेक आजारांवर गुणकारी केसर आणि मणुक्याचे पाणी

Saffron and Manuka water are effective against many diseases


By nisha patil - 3/15/2024 7:25:43 AM
Share This News:



 मणुका आणि केसर या दोन्हीत असे औषधी गुणधर्म आहेत ज्यांच्यामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. यासाठी केसर आणि मणुक्याचे पाणी कसे तयार करावे आणि त्याचे फायदे कोणते आहेत, याविषयी आम्ही तुम्हाला येथे माहिती देणार आहोत. सौंदर्य खुलविण्यासाठीही केसर, मणुका लाभदायक आहे. यकृताची समस्या, अ‍ॅनिमिया, दृष्टीदोष, हृदयरोग, केस गळणे, सर्दीपडसे, पचनक्रिया, उदासिनता अशा विविध आजारांवर केसर आणि मणुक्याचे पाणी खूपच गुणकारी ठरते.

प्रथम आपण मणुक्याचे पाणी कसे करावे हे पाहू. यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. यात मणुका टाकून रात्रभर ठेवा. सकाळी याला गाळून घ्या आणि प्या. हे पाणी बनवण्यासाठी गडद रंगाचे मणुके निवडा. यामुळे जास्त फायदा होईल. मणुक्याचे पाणी यकृतामध्ये बायोकेमिकल प्रोसेस सुरू करते. ज्यामुळे रक्त वेगाने शुद्ध होऊ लागते. या पाण्यामुळे यकृतासंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसेच या पाण्यामध्ये लोह असते. रक्त निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सही यात असते जे अ‍ॅनिमिया दूर करण्यास मदत करते. दृष्टी सुधारण्यासाठी देखील हे पाणी लाभदायक आहे. यात असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी चांगली करते.

ज्यांनारातआंधळेपणा किंवा डोळ्यांचे स्नायू अशक्त आहेत, त्यांनी हे पाणी प्यायल्यास फायदा होतो. हृदयाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी मणुक्याचे पाणी प्यायले पाहिजे. मणुक्याचे पाणी रोज प्यायल्यास कोलेस्ट्रोरॉलचे प्रमाण संतुलित राहाते. हृदयासंबंधी आजार आणि स्किनसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरते.आता केसरचे पाणी कसे तयार करायचे ते पाहुयात. केसऱ्यांच्या धाग्यांना पाच मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवून ठेवा. नंतर प्यावे. केसरच्य पाण्यास कैफिनपेक्षा जास्त असरदार मानले जाते. म्हणून चहाऐवजी हे पाणी प्यावे. हे पाणी पिण्याचे ४ फायदे आहेत. केस गळतीसाठी हे पाणी खूपच गुणकारी आहे. बदलणाऱ्या ऋुतूमुळे गेस गळती सुरू होते.


ही केस गळती कमी करण्यासाठी केसरचे पाणी दररोज प्यायल्यास केस मजबूत व चमकदार होतात. केसर हे गरम असल्यामुळे सर्दी-पडसे झाल्यावर प्यावे. जर खूप दिवसांपासून सर्दी-पडसे असल्यास तसेच लवकर आराम मिळण्यासाठी हे पाणी दिवसांतून दोनवेळा प्यावे. ज्यांना पचनाची समस्या असते, त्यांनी केसराचे सेवन करावे. यामुळे पोटातील दुखणे बरे होते आणि पचनक्रियेच्या प्रक्रिया मजबूत होते. काही लोकांना सतत उदासिनता जाणवते. अशा लोकांनी दररोज केसरचे पाणी प्यावे. केशरयुक्त पाण्याच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे त्यास मूड बुस्टरदेखील म्हटले जाते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून आजारांपासून बचाव होतो. केसरचा उपयोग नेहमी सीमित करावा. याच्या जास्त वापराने तोंड सुखते, आळस, भुकेमध्ये बदल आणि डोके दुखण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे केसर कमी अथवा योग्यप्रमाणातच वापरले पाहिजे.


अनेक आजारांवर गुणकारी केसर आणि मणुक्याचे पाणी