खेळ

विवेकानंद कॉलेजचा साहिल तुरटे मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम

Sahil Turte of Vivekananda College stands first in marathon competition


By nisha patil - 8/29/2024 7:39:01 PM
Share This News:



13 व्या राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त कोल्हापूर एनसीसी ग्रुप मार्फत पाच किलोमीटर मॅरेथॉनचे एनसीसी भवन कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते . सदरच्या स्पर्धेत कोल्हापूर शहरातील 400 एनसीसी छात्रानी  भाग घेतला होता.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय खेळ दिनाच्या औच्यात्याने  सर्व समावेशक आणि शांतीपूर्ण समाज निर्मिती करण्यासाठी या राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त कोल्हापूर एनसीसी ग्रुप मार्फत स्पर्धेचे आयोजन केले होते. सदरच्या स्पर्धेसाठी विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी 30 छात्रांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत सार्जंट साहिल तुरटे याने प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेतील सहभागासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार,  आय क्यू ए सी प्रमुख डॉ. श्रुती जोशी, एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले,  लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, महाविद्यालयाचे रजिस्टार

श्री आर.बी. जोग,  पाच महाराष्ट्र बटालियन प्रमुख कर्नल मानस दीक्षितए कर्नल सुहास काळेए जी सीआय अपूर्वा शेलार  यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजचा साहिल तुरटे मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम