बातम्या
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी सादर केलेल्या अर्जाच्या प्रती सादर कराव्यात
By nisha patil - 12/7/2024 8:56:49 PM
Share This News:
कोल्हापूर, : राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये व महिला समृध्दी योजना 1.40 लाख रुपये या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. ज्या अर्जदारांनी सुविधा कर्ज योजना रक्कम 5 लाख रुपये व महिला समृध्दी योजना रक्कम 1.40 लाख रुपये या योजनांमध्ये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत अशा अर्जदारांनी ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची प्रत एकूण 3 झेरॉक्स प्रतीत स्वयं साक्षांकित करुन दिनांक 18 जुलै 2024 रोजी पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी- मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.या योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक 22 मार्च 2024 रोजीपर्यंत भरुन घेण्यात आले होते. ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत 3 प्रतीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करणे आवश्यक आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी सादर केलेल्या अर्जाच्या प्रती सादर कराव्यात
|