बातम्या
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत
By nisha patil - 7/23/2024 9:46:49 PM
Share This News:
राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी पीएम अजय योजना तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना (1 लाख रुपये) योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या www.lokshahir.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक गरजु व होतकरु लोकांनी www.lokshahir.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील दरिद्रय रेषेखालील व गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लोकांमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे, परंतु उत्पन्नाच्या साधनाच्या अभावामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्यामुळे त्यांची आर्थिक पत घसरल्यामुळे महामंडळ व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राष्ट्रीयकृत बँका मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील अर्जदारांना कर्ज मंजूर करताना टाळा-टाळ करतात किंवा कर्ज प्रकरण मंजूर करीत नाहीत, त्यामुळे मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांची व्यवसाय करण्याची पात्रता असूनही कर्ज मंजूर केले जात नाही. अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करुन महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित करण्यात आली असून राष्ट्रीय अनुसुचीत जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली (NSFDC) येथे योजनांचे अर्ज तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना (1 लाख रु.) ऑनलाईन पध्दतीने www.lokshahir.in या वेबसाईट प्रणालीवर सादर करावेत.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत
|