बातम्या

"सहकार भारतीय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना 'कै. अण्णासाहेब गोडबोले' पुरस्कार प्रदान"

Sahkar Bharati MLA PrakashAnna Awade presented with K Annasaheb Godbole award


By nisha patil - 9/24/2024 12:15:36 PM
Share This News:



केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्राच्या सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना 'कै. अण्णासाहेब गोडबोले' हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार शिर्डी येथे राजस्थानचे राज्यपाल  हरिभाऊ बागडे व महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

सहकारात काही चांगले घडावे व नैतिकतेच्या तसेच सामाजिक जाणीवेच्या पायावरच ही चळवळ उभी रहावी असे मनापासून वाटणाऱ्या काही प्रमुख मंडळींनी १९७८ मध्ये एकत्र येऊन सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली. ४६ वर्षया संघटनेचे कार्य अविरतपणे सुरु आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष 'के, अण्णासाहेब गोडबोले' यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या मानाचा सर्वोच्च पुरस्कारासाठी इचलकरंजीचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची निवड केली आहे.

यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनानाथजी ठाकूर, संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री. संजयजी पाचपोर, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेश महिला संस्था प्रकोष्ट प्रमुख सौ. वैशालीताई आवाडे वहिनी, भालचंद्र कुलकर्णी, श्रीकांत पटवर्धन, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सहकार भारती प्रदेशाध्यक्षा शशीताई अहिरे, अजय ब्रम्हेचा, जवाहरजी छाबडा, धोंडीराम पागडे, मिलिंद भागवत, प्रकाश पाठक, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, संचालक अभयकुमार काश्मिरे, संचालक सुमेरू पाटील, संचालक शीतल अमन्नावर, संचालक आदगोंडा पाटील, संचालक दादासो सांगावे, संचालक सुकुमार किनिंगे, संचालक संजयकुमार कोथळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


"सहकार भारतीत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना 'कै. अण्णासाहेब गोडबोले' पुरस्कार प्रदान"