बातम्या

सहयाद्री विंग्स फौंडेशनने जपली सामाजिक ,नैसर्गिक बांधिलकी

Sahyadri Wings Foundation maintains social


By nisha patil - 8/16/2023 4:04:32 PM
Share This News:



शिरोली पुलाची : शिरोली पुलाची येथील सहयाद्री विंग्स फौंडेशनने 76 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गगनबावडा तालुक्यातील जरगी या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना कपडे,शालेय साहित्य व मिष्टान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच जरगीतील शालेय परिसरात झाडे लावून या फौंडेशनने नैसर्गिक बांधीलकी जपली.   
        याबाबत अधिक माहिती अशी कि , शिरोली पुलाची येथील सहयाद्री विंग्स फौंडेशन हे प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यास अग्रेसर असते . हे फौंडेशन  2017 पासून प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून दुर्गम भागातील शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना कपडे,शालेय साहीत्य वाटप करत असते . या वर्षीही त्यांनी नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत गगनबावडा तालुक्यातील जरगी दुर्गम भागास मदत केली यावेळी शिरोलीतील नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक बाजीराव कृष्णात चव्हाण यांच्या हस्ते त्याठिकाणी ध्वज फडकवण्यात आला.  त्यांनी  मुलांना सैन्य भरतीविषयी मार्गदर्शन केले आणि अर्जुन चौगले, अमोल मानकापुरे आणि राहुल करपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .तसेच शाळेचे मुख्याध्यापक  अरुण कांबळे यांनी आभार व्यक्त केले.


सहयाद्री विंग्स फौंडेशनने जपली सामाजिक ,नैसर्गिक बांधिलकी