बातम्या

सई ताम्हणकरचा लूक एकदम खास

Sai Tamhankars look is very special


By nisha patil - 1/18/2024 4:50:51 PM
Share This News:



सई ताम्हणकर म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय, अनेकांच्या भुवया उंचावतात. मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.सईच्या एकेक अदा म्हणजे 'परी म्हणू की सुंदरा' अशा आणि दिलखेचक असतात.मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सई ताम्हणकरने नुकतेच एक फोटोशूट केलं आहे.नक्षीदार काठाच्या काळ्या साडीत सईचे सौंदर्य अधिकच खुलतंय.सईचा हा भन्नाट लूक म्हणजे जणू काही स्वर्गातील अप्सरेचा साज असाच आहे.सईचे फोटो म्हणजे तिच्या फॅन्ससाठी पर्वणीच, तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतो.सई ताम्हणकरने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.सई तिच्या "श्री देवी प्रसन्न" या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सई ताम्हणकरचा लूक एकदम खास