बातम्या

संत बाळूमामांची भविष्यवाणी खरी ठरली

Saint Balumamas prediction came true


By nisha patil - 7/25/2023 6:54:01 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी -- श्री संत बाळू मामा हे महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविकांचे  श्रद्धास्थान आहेत . हुन्नर (कर्नाटक) येथे असणाऱ्या प्राचीन विठ्ठल बिरदेव मंदिरात संत बाळूमामा नेहमी जात असत . त्यावेळी त्यांनी भक्तांच्या समोर या मंदिराच्या शिखरावर बसून कावळा पाणी पिणार अशी भविष्यवाणी  केली होती . पण याच गांभीर्य त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही . त्यानंतर काही वर्षांनी या ठिकाणी हिडकल डॅम बांधण्यात आला . प्राचीन विठ्ठल बिरदेवाचे मंदिर पाण्याखाली गेले आणि या मंदिराच्या शिखरावर कावळे पाणी पिताना भाविकांना दिसू लागले आणि सर्व भाविकांना संत बाळूमामांनी केलेल्या भविष्यवाणीची प्रचिती आली . 
        दरम्यान संत बाळुमामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात केर्ली इथल्या श्री बाळूमामा वृक्षारोपण संकल्प समितीच्या वतीने वृक्षमित्र पंडीत माने व नवनाथ माने यानी वृक्षारोपण केले . त्यांनी तेथील भाविकांना कढीपत्ता लागवड तसेच  ऑक्सिजन पार्क तयार करण्यासाठी  कर्पूरातुळश व रान तुळस रोपाचा पुरवठा केला . त्यांचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांना संभाजी गावडे, नाथ महाराज ,श्री संत बाळुमामा मंदिर खदणाळ भक्तगण , मुरारी ,लोहार  हणमंत शिरगुपे ,दयानंद कोणकेरी सावकार ,भडगाव किरण धनगर याचे योगदान लाभल्याने वृक्षारोपण मोहिम यशस्वी झाली.


संत बाळूमामांची भविष्यवाणी खरी ठरली