बातम्या
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता घसघशीत वाढ
By nisha patil - 1/16/2025 4:22:41 PM
Share This News:
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता घसघशीत वाढ
आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल
केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच मोठी वाढ होणार आहे.
कॅबिनेटने आज आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दिला असून यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीच्या दृष्टीने एक मोठा वळण घेतला आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे.आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, याबाबत लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, "आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?" आता त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, आणि कर्मचारी वर्गासाठी एक सुखद बातमी आहे.आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे, परंतु याबाबत कोणत्या कर्मचाऱ्यांना किती लाभ होईल, हे लवकरच स्पष्ट केले जाईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता घसघशीत वाढ
|