बातम्या

सलमान खानचा गजनी लूक हा चर्चेचा विषय

Salman Khans Ghajini look is the talk of the town


By nisha patil - 8/21/2023 4:34:57 PM
Share This News:



बॉलिवूडचा भाईजान सलमान खान  सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूक मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत. 

सलमान खान 20 ऑगस्टला मुंबईत एका पार्टीला गेला होता. त्यावेळी अभिनेत्याचा गजनी लूक पाहायला मिळाला. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानचा डॅशिंग लूक पाहून चाहत्यांना 20 वर्षांपूर्वीच्या भाईजानची आठवण झाली आहे.
 

सलमान खानच्या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भाई का जलवा, भाईजान जवानचं प्रमोशन करत आहे, तेरे नाम अगेन, 'तेरे नाम 2'च्या तयारीला भाईजानने सुरुवात केली, 20 वर्षांपूर्वीचा सलमान पुन्हा पाहायला मिळाला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'तेरे नाम' आणि 'सुल्तान' सारख्या सिनेमांत सलमानचा गजनी लूक पाहायला मिळाला आहे.


सलमान खानचा गजनी लूक हा चर्चेचा विषय