बातम्या

सलमान खानचा 'हा' चित्रपट 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप

Salman Khans film Ha flopped despite earning 100 crores


By nisha patil - 12/6/2024 6:28:06 PM
Share This News:



बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. 2000 नंतर सलमानच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. पण 90 च्या दशकात भाईजानला मोठा संघर्ष करावा लागला आहे. सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. पण त्याचा एक चित्रपट मात्र 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप समजला जातो. सलमानच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सलमान खानचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात फिल्मी घराण्यात झाला. पण तरीही त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. त्याला मोठ्या प्रमाणात संघर्षाचा सामना करावा लागला आहे. सलमान खान हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय पटकथालेखक, अभिनेते आणि निर्माते सलीम खान यांचा मुलगा आहे. सलीम खान यांचा मुलगा असल्याने त्याला बॉलिवूडमध्ये सहज पदार्पण करता आलं. पण खरा संघर्ष त्यानंतर होता. 'बीवी हो तो ऐसी' हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. पण त्याला पहिला हिट चित्रपट 'मैंने प्यार किया' ठरला. या चित्रपटाला सलमानला जास्त फायदा झाला नाही. तर भाग्यश्रीला या चित्रपटाच्या यशाचं क्रेडिट देण्यात आलं. त्यानंतर भाग्यश्रीने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं आणि बॉलिवूडपासून दूर झाली. पहिल्या हिट चित्रपटानंतरही चांगला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. 'IIFA 2022' पुरस्कार सोहळ्यात भाईजानने याबद्दल भाष्य केलं आहे.


सलमान खानचा 'हा' चित्रपट 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप