बातम्या

चौगुले महाविद्यालयात संत रोहीदास यांना अभिवादन

Salutations to Sant Rohidas at Chaugule College


By nisha patil - 2/24/2024 3:54:32 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयात संत रोहीदास यांना अभिवादन

युगपुरुष यांच्या जयंती, पुण्यतीथी साजरी कल्याने आजच्या पिढीला ईतिहास कळेल - डॉ. पाटील

कोतोली - श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये संत रोहिदास महाराज यांना अभिवादन. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवाजीराव पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु. आरती पाटील हिने केले तर आभार कु.शामल लव्हटे हिने मानले. श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील, शिवाजीराव पाटील
प्रो.डॉ.बी.एन.रावण आदी उपस्थित होते.


चौगुले महाविद्यालयात संत रोहीदास यांना अभिवादन