बातम्या
शहाजी महाराजांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
By nisha patil - 4/4/2024 12:39:19 PM
Share This News:
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज, शहाजी महाराज यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेलं आहे.त्यांच्या विचारानेच आम्ही सर्वजण वाटचाल करीत आहोत.
आपणही महाराजांच्या विचारांचे वारसदार व्हा असे आवाहन मधुरिमा राजे छत्रपती यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाराज यांच्या 114 व्या जयंतीदिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, सर्व प्राध्यापक , प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.
मधुरिमा राजे छत्रपती म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरीचे धरण बांधले. आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व लोकांची पाण्याची गरज ते भागवत आहे. त्यांनी सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला.त्या कायद्याची अंमलबजावणी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे.प्लेग च्या साथी मध्ये त्यांनी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी कोरोना काळातही सरकारच्या वतीने करण्यात आली. शाहू महाराजांच्या प्रमाणेच राजाराम महाराज, शहाजी महाराजांनीही कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. तोच वारसा आताचे शाहू महाराज आणि आम्ही सर्वजण चालवत आहोत. आपण सर्वांनी शाहू महाराजांचे हे विचार अंगीकारावेत, त्यांच्या विचाराचे वारसदार व्हावे .
प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांचे आचार, विचार आणि कृती एक होती.त्यांच्या उदात्त विचारानेच कोल्हापूरसह देशाची प्रगती झाली आहे. तोच विचार सर्वांनी पुढे न्यावा.
सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पी. बी. पाटील यांनी केले. प्रा. पी.के.पाटील यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ.आर.डी.मांडणीकर, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी श्री विठ्ठल आंबले,प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.
शहाजी महाराजांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
|