बातम्या

चौगुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Salutations to Yashwantrao Chavan at Chaugule College


By nisha patil - 12/3/2024 7:33:54 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

पन्हाळा :प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक (७१२६०)  अभ्यास केंद्राच्या मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त केंद्रप्रमुख व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवाजीराव पाटील  होते. यावेळी महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री,भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण  यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी-कोटी नमन करून त्यांचे साहस,संघर्ष आणि राष्ट्रभक्ती  या गुणांचा युवकांनी व समाजातील प्रत्येक घटकांनी अंगीकारावा.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून  केंद्र संयोजक प्रा.दत्तात्रय नाईक, केंद्र सहाय्यक संभाजी चौगले, प्रा.संग्रामसिंह मोरे,.विलास खापणे व इतर मान्यवर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  स्वागत प्रा. दत्तात्रय नाईक यांनी केले तर आभार श्री संभाजी चौगले माने यांनी मानले.

 


चौगुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन