बातम्या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे अभिवादन

Salute to Kranti Jyoti Savitribai Phule through various activities at Shahaji College


By nisha patil - 3/1/2025 11:10:29 PM
Share This News:



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे अभिवादन

 कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमा पूजन, पथनाट्य, व्याख्यान, विद्यार्थ्यांची भाषणे आणि ग्रंथ वाचनाने अभिवादन करण्यात आले.क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेटाने चालवू असा विश्वास विद्यार्थिनींनी व्यक्त केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंग्रजी विभागातील प्राध्यापिका सौ. शोभा चाळके म्हमाने यांनी सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याचा आढावा  व्याख्यानातून घेतला. 
 

महिला सुरक्षिततेवर अकरावी, बारावीच्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर असे पथनाट्य सादर केले. समीक्षा शरद माने, समृद्धी बाबासाहेब गुरव व इतर विद्यार्थिनींनी भाषणे करून सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली. 
 

प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण म्हणाले, प्रचंड यातना सहन करूनही सावित्रीबाई फुले  व महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे चालवला. देशातील पहिली शाळा त्यानी सुरू केली. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केल्यामुळेच आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया चमकत आहेत. सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा सर्वांनी पुढे चालवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे वाचन यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले. 
   

स्वागत व प्रास्ताविक प्रा.एस.डी.चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. आर. भुयेकर यांनी केले. आभार प्रा. एस. पी. पाटील यांनी मांनले.सांस्कृतिक विभाग समितीच्या प्रमुख डॉ. ए. डी. पाटील, प्रा. ए.बी.शळके,प्रा.सागर चरापले,प्रा.पी.एच.पाटील यांनी संयोजन केले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसे देण्यात आली. 
शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले. सहाय्यक ग्रंथपाल सौ. यु यु साळोखे, सौ. एम. एम .भोसले ,सौ.अर्पणा गावडे, सुहास टिपुगडे, बाळकृष्ण इंगवले, अतुल कांबळे यांनी संयोजन केले. 

 

सावित्रीबाई यांच्यावरील निबंधांचे व पुस्तक परीक्षणांचे प्रदर्शनही यावेळी करण्यात आले. ग्रंथपाल डॉ पांडुरंग पाटील, प्रा. स्नेहल भोसले यांनी संयोजन केले.डॉ. डी.के.वळवी, डॉ.एन.एस.जाधव,डॉ ए.बी.बलुगडे, प्रा. पि.के पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे  उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे अभिवादन
Total Views: 37