बातम्या
कोरगांवकर हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन.
By nisha patil - 2/10/2024 4:31:47 PM
Share This News:
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर संचालित कोरगांवकर हायस्कूल सदर बाजार येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती दिनानिमित्त विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले . यावेळी आयोजित कार्यक्रमा प्रसंगी प्रतिमा पूजन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तिपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले . पायल पवार, श्रेया हुलस्वार ,समृद्धी सावंत ,प्राची गायकवाड, सुहाना शेख ,आराध्या गायकवाड या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले . विद्या बाचनकर व तृप्ती रावराणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .प्रमुख वक्ते मुख्याध्यापक संजय सौंदलगे व ज्येष्ठ शिक्षक अनिल चव्हाण यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. 'कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख तृप्ती डुणुंग, सुरेखा मोरबाळे ,सदाशिव हटवळ, नागेश हंकारे ,सुनील साजणे, प्रभू रेळेकर, निवेदिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धी बिरांजे हिने केले .तर आभार प्रदर्शन जुवेरिया शेख यांनी केले .
कोरगांवकर हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन.
|