बातम्या
गोकुळ मार्फत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन...
By nisha patil - 2/10/2024 4:38:27 PM
Share This News:
कोल्हापूर, ता.०२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांनी प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील. जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, तर साधेपणा आणि विनम्रतेचे प्रतिक असलेले लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देवून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला. अशा या थोर व्यक्तींचे देशाच्या जडणघडणी मध्ये लाखमोलाचे योगदान आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.पी.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुंरबेकर, दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, बी.एस.मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळ मार्फत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन...
|