बातम्या
समरजीत घाटगेंनी कागलमधील ती जागा परत करावी अन्यथा संघर्ष उद्भवेल : ना. हसन मुश्रीफ
By nisha patil - 1/2/2025 3:33:36 PM
Share This News:
कागलचे जुने तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशनचा तुरुंग, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन दवाखाना, नगरपालिकेच्या मालकीची शाहू सांस्कृतिक हॉलची जागा समरजीत घाटगे यांनी गुपचूपपणे आपल्या कुटुंबीयांच्या नावावर लावून घेतली आहे.
कागलच्या जनतेच्या मालकीची ही जागा स्वतःच्या नावावर लावून घेताना त्यांना लाज कशी वाटली नाही. ही जागा त्यांनी होती तशी परत हस्तांतरित करावी, अन्यथा फार मोठा संघर्ष उद्भववेल. रस्त्यावरच्या लढ्यासह न्यायालयीन लढाही लढू असे वक्तव्य कार्यक्रमावेळी बोलताना ना. हसन मुश्रीफांनी केले.
ना. मुश्रीफ म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना योग्य ती जागा दाखवलीय. त्यांनी संपत्तीचा इतका हव्यास धरू नये. समस्त कागलवासीयांच्यावतीने विनंती करतो की, त्यांनी हा आग्रह सोडावा. त्यांनी ही जागा तातडीने नगरपालिकेला होती तशी हस्तांतरीत करावी.
जुने तहसीलदार कार्यालय असलेल्या जागेत नगरपालिकेच्यावतीने पार्किंगसह मॉल बांधायचा आहे. यावेळी कागलचे अधिपती श्रीमंत बाळ महाराज यांच्या थोरल्या कन्या व स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या बडोदा येथील भगिनी श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली.
समरजीत घाटगेंनी कागलमधील ती जागा परत करावी अन्यथा संघर्ष उद्भवेल : ना. हसन मुश्रीफ
|