बातम्या

समरजीत घाटगे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार

Samarjit Ghatge will explain his position tomorrow


By nisha patil - 5/7/2023 4:33:25 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. पवारांच्या सोबत असणाऱ्या आमदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे देखील सहभागी झाले. मात्र मुश्रीफ यांच्या महायुतीतील प्रवेशाने भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे दरम्यान समरजीत सिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी उद्या कागल मधील गैबी चौकात असणाऱ्या ज्युनिअरकरांच्या वाड्यामध्ये सकाळी दहा वाजता समरजितसिंह घाटगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत याबाबत तिने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या बैठकीत समरजीत सिंह घाटगे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिल आहे.


समरजीत घाटगे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार