बातम्या

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या घोषणेबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समरजितसिंह घाटगे यांनी केले अभिनंदन

Samarjitsinh Ghatge congratulated Minister


By nisha patil - 2/14/2024 8:08:13 PM
Share This News:



कागल,प्रतानिधी. राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच केली. राज्य सरकारच्या या धाडसी निर्णयाबद्धल मा.चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबईत भेट घेऊन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह  घाटगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  येत्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पैशाअभावी मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.त्यांना उच्च शिक्षणास प्रोत्साहन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध कल्याणकारी योजना प्रभावी राबवित आहे.शुल्क माफीचा हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे पालकातून समाधान व्यक्त होत आहे.

छायाचित्र- मुंबई येथे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीची घोषणा केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह  घाटगे


मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या घोषणेबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समरजितसिंह घाटगे यांनी केले अभिनंदन