बातम्या

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या घोषणेबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समरजितसिंह घाटगे यांनी केले अभिनंदन

Samarjitsinh Ghatge congratulated Minister Chandrakantdada Patil for announcing free higher education for girls

By nisha patil - 2/16/2024 6:06:27 PM
Share This News:

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या घोषणेबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समरजितसिंह  घाटगे यांनी केले अभिनंदन

कागल,प्रतानिधी. राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच केली. राज्य सरकारच्या या धाडसी निर्णयाबद्धल मा.चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबईत भेट घेऊन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह  घाटगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  येत्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पैशाअभावी मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.त्यांना उच्च शिक्षणास प्रोत्साहन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध कल्याणकारी योजना प्रभावी राबवित आहे.शुल्क माफीचा हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे पालकातून समाधान व्यक्त होत आहे.

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या घोषणेबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समरजितसिंह घाटगे यांनी केले अभिनंदन