बातम्या

श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

Sambhaji Brigade Aggressive against Donation Box in Sri Ambabai Temple


By nisha patil - 10/7/2023 5:08:52 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बेकायदेशीर ठेवण्यात आलेले दानपात्र तात्काळ हटवा या मागणी साठी संभाजी ब्रिगेडने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. श्री अंबाबाई मंदिरात नियमित दानपेटी असतानाही श्री पूजकांकडून व्यक्तिगतरीत्या बेकायदेशीरपणे दुसरे दानपत्र ठेवले आहे या दानपत्रातून दररोज हजारो रुपयांची रक्कम जमा होत असते त्यामुळे देवस्थान समितीचे महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे दानपत्र तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी व्यक्त केली.
 


श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक