बातम्या

संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश

Sambhajinagar racket busted


By nisha patil - 5/18/2024 4:19:34 PM
Share This News:



शहरातील  गारखेडा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्रावर रविवारी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी एक इंजिनिअरिंग करणारी 19 वर्षांची तरुणी हा सर्व रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान याच प्रकरणात आता अनेक धागेदोरे समोर येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात 15 ते 20 एजंट्सचं जाळं असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
 

संभाजीनगर शहरातील  गारखेडा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्रावर रविवारी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी एक इंजिनिअरिंग करणारी 19 वर्षांची तरुणी हे सर्व रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान याच प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असताना आता अनेक धागेदोरे समोर येत आहे.
 

विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत एक इंजिनिअरिंग करणारी तरुणी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ  उडाली होती. त्यानंतर रोज खुलासे होत आहेत.


संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश