बातम्या
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत रावी अनुप पोवारची उज्वल कामगिरी
By nisha patil - 3/27/2025 3:03:26 PM
Share This News:
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत रावी अनुप पोवारची उज्वल कामगिरी
कोल्हापूर – समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी रावी अनुप पोवार हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने ९० गुण मिळवत केंद्र तृतीय क्रमांक पटकावला आहे.
रावी म.न.पा. नेहरूनगर विद्यामंदिर येथे शिक्षण घेत असून, तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचे आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या मेहनतीला मिळालेल्या या यशामुळे शाळेत आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
शैक्षणिक प्राविण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा ही एक महत्त्वाची संधी ठरते. रावीच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत रावी अनुप पोवारची उज्वल कामगिरी
|