बातम्या

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil


By nisha patil - 5/29/2024 3:18:47 PM
Share This News:



'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची टीम आज प्रमोशनसाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांचा यश नव्हे, तर संघर्ष सर्वांसमोर आणायचं आहे. जरांगे पाटील फक्त लाठीचार्ज मुळे मोठे झाले नाहीत, तर त्याआधी ही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते, हेच राज्याच्या समोर आणायच्या उद्दिष्टाने "संघर्ष योद्धा" चित्रपट तयार केला. 21 जूनला फक्त मराठा समाजाचे नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा, अशी भावना 'संघर्ष योद्धा' चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली.
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकारसोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्ष योद्धा' चित्रपट 21 जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने विदर्भात चित्रपटाचे प्रमोशन केले.


संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.