बातम्या

हणमंतवाडी च्या संजय जाधव यांच्या वतीने पैलवानांना मदत

Sanjay Jadhav of Hanmantwadi helps wrestlers


By nisha patil - 5/2/2024 2:03:57 PM
Share This News:



हणमंतवाडी च्या संजय जाधव यांच्या वतीने पैलवानांना मदत

समाजातील गरजूंना मदतीला धावून जाणारे हणमंतवाडी चे मा.सरपंच  संजय जाधव यांनी दोनवडे येथील एन आय एस कुस्ती आखाडा चे पैलवान आदित्य ताटे याने चेन्नई  झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला कास्य पदक मिळवून दिले. तसेच नँशनल पैलवान श्रावणी महादेव लव्हटे हीच्या कुस्ती करिअर मध्ये केलेल्या कामगिरी बद्दल खुराक साठी  प्रत्येकी 11000 रू   देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हणमंतवाडी चे मा.सरपंच संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुस्तीत कामगिरी वाढवून सातत्य ठेवले आहे. जाधव यांच्या कडून पैलवान यांना वेळोवेळी मदत, सहकार्य केले जाते. याबाबत तालमीच्या वतीने त्यांना धन्यवाद देत असल्याने एन.आय.एस कोच संदीप पाटील  यांनी  तारा न्युज शी बोलताना सांगितले.


हणमंतवाडी च्या संजय जाधव यांच्या वतीने पैलवानांना मदत