बातम्या

संजय मंडलिक यांना दिलासा...तर धर्याशिल माने यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Sanjay Mandliks relief


By nisha patil - 3/25/2024 5:03:26 PM
Share This News:



एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा होती ... 
 

दरम्यान, खासदार संजय मंडलिक यांना आज  महायुतीकडून तिकीट मिळालं मात्र धैर्यशील माने हे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन  मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या. मुंबईतून महायुतीच्या उमेदवारांची जी यादी दिल्लीला गेली आहे. त्यामध्ये मंडलिक यांच्यासह आणि धर्याशील माने यांचं ही नाव असल्याच सांगण्यात येतय ...
 

आपल्या कोणत्याही खासदारांची उमेदवारी कापली गेली तर त्याचा आमदारांपर्यंत संदेश चांगला जाणार नाही. हे शिवसेनेसाठी तसेच महायुतीसाठीही धोक्याचे असल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना पटवून दिले आहे. त्यामुळे मल्लिकांसह ,मानेंची ही उमेदवारी निश्चित मानली आहे . परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील तंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही, तोपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे.


संजय मंडलिक यांना दिलासा...तर धर्याशिल माने यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता