बातम्या

कोल्हापूर: संजय पाटील यांची शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती

Sanjay Patil appointed as President of West Maharashtra Farmers Association


By nisha patil - 8/20/2024 9:33:20 PM
Share This News:



कोल्हापूर: संजय पाटील यांची शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती;

उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर - रघुनाथ दादा पाटील

*कोल्हापूर, 20 ऑगस्ट:* राजारामपुरी, कोल्हापूर येथे आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आयोजित छोटेखानी मेळाव्यात परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष जनस्वराज्यशक्ती पक्ष श्री संजय पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला, ज्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते श्री रघुनाथ दादा पाटील आणि जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी भाग घेतला.

या प्रसंगी बोलताना संजय पाटील यांनी आपल्या वीस वर्षांच्या संघर्षमय कारकिर्दीचा उल्लेख करत, "शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आंदोलनं करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. रेशनच्या काळाबाजाराला विरोध करताना माझे रक्त सांडले आहे, पण त्यातून मी रेशन ग्राहकांसाठी न्याय मिळवला आहे. भविष्यात, पक्षाने संधी दिल्यास, मी उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करू," असे त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे नेते श्री रघुनाथ दादा पाटील यांनी संजय पाटील यांची उमेदवारी उत्तर विधानसभा मतदारसंघातून जाहीर केली. त्यांनी असेही सांगितले, "संजय पाटील यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक नेतृत्व आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शेतकरी संघटनेला अधिक बळ मिळेल आणि संघटनेचा विस्तार शहरासह ग्रामीण भागांत होईल."

जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी आभार व्यक्त करताना सांगितले, "संजय पाटील यांच्या प्रवेशामुळे संघटनेला एक लढवय्या कार्यकर्ता मिळाला आहे, ज्यामुळे भविष्यात संघटनेची वाढ होईल आणि संघटना अधिक बळकट होईल."

या छोटेखानी मेळाव्यात अनिल कवाळे, संग्राम जाधव, पिंटू जाधव, प्रकाश पाटील, बंकट सूर्यवंशी, सैराट पाटील, सौरभ पवार, बापू पवार, तानाजी मोरे, अक्षय पैलवान, रोहित जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पाटील यांनी "एक नोट, एक वोट" या धर्तीवर निवडणूक लढवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


कोल्हापूर: संजय पाटील यांची शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती