बातम्या
६ जुनला भगव्या ध्वजाजे ध्वजारोहण करावे - संजय पवार
By nisha patil - 5/31/2024 7:35:08 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी ६ जुनचा शिवराज्याभिषेक दिन मोठा उत्साहात करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी
अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांसी सस्नेह जय महाराष्ट्र ! कळविण्यासाठी अहवान केले आहे. दरवर्षी ६ जुन हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे. ६ जुन २०२४ हा शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वर्षाचा सोहळा आहे. ६ जुन २०२४ हा शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या उत्साहात साजरा करावा असे शिवसेनेचे मत आहे. ६ जुन २०२४ रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर व सर्व ग्रामपंचायतवर स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा झेंड्याचे झेंडावंदन करावे, गुढी उभी करावी व कोल्हापूरातील सर्व नागरीकांनी घरावर भगवे
झेंडे लावावेत व गुढी उभा करावी असे आपण आवाहन करावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्याच्या सुचना देण्यात याव्या. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, भुदरगड, रांगणागड, सामानगड, पारगड, कलानिधीगड, महीपाल गड, गंधर्व गड हे शिवकालीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व जिंकलेले गड किल्ले आहेत. ६ जुन २०२४ रोजी हे गड ज्या प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली येतात. आदी ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात यावेत.
६ जुनला भगव्या ध्वजाजे ध्वजारोहण करावे - संजय पवार
|