बातम्या

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून शिंदे गटावर केली टीका

Sanjay Raut criticizes Shinde group over Shiv Senas anniversary


By nisha patil - 6/18/2024 9:02:09 PM
Share This News:



शिवसेना पक्षाचा उद्या 58 वा वर्धापन दिन आहे. एकीकडे या वर्धापन दिनाची उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे दोनही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वर्धापनदिनावरून वाद रंगला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी वर्धापनदिनावरून शिंदे गटावर व तोफ डागली. तर आता मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.  बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांनी शिवसेनेचा वर्धापनदीन  साजरा करू नये. उद्या डोम नावाच्या सभागृहात डोम कावळे जमणार आहेत, असे त्यांनी म्हटले. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकरांच्या विजयावरूनही शिंदे गटावर निशाणा साधला. यावरून आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. सर्वात मोठा डोमकावळा तर संजय राऊत आहे. घाबरतो का मी त्याला, असा एकेरी उल्लेख करत दादा भुसे यांनी संजय राऊत यांना डिवचले आहे


संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून शिंदे गटावर केली टीका