बातम्या

संजय राऊत सर्वात मोठा डोमकावळा...

Sanjay Raut is the biggest domkavala


By nisha patil - 6/19/2024 12:57:40 PM
Share This News:



सर्वात मोठा डोमकावळा तर संजय राऊत आहे. घाबरतो का मी त्याला, असा एकेरी उल्लेख करत दादा भुसे यांनी संजय राऊत यांना डिवचले आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेवेळी आम्ही गोधडीत होतो. तर राऊत कुठे होते. ते तर कारकूनी करत होते. आता त्यांना वेगळ्या पदाचे वेध लागले आहेत. पक्षाचे विचार आम्ही सोडलेले नाहीत. जिथे जिंकून येतात तिथे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जात नाही. पराभव झाला की लगेच ईव्हीएमकडे बोट दाखवल जाते. पुढील चार महिनेही असाच खोटा नेरेटिव्ह सेट केला जाणार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे


संजय राऊत सर्वात मोठा डोमकावळा...