बातम्या

विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांचं मोठं भाकीत

Sanjay Rautas big prediction in the face of the Legislative Assembly


By nisha patil - 8/13/2024 7:17:00 PM
Share This News:



 यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची  घोषणा केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा असून विरोधकांनी या योजनेवरून महायुती सरकारवर  जोरदार निशाणा साधलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी लाडकी बहीण योजनेवरून थेट अजित पवारांचा  बारामतीत लाडक्या बहीण पराभव करतील, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत म्हणाले की,  सरकारने जाहीर केलेल्या या योजना लाडक्या बहिणींसाठी नाहीत. त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहेत का? यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू, त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे


विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांचं मोठं भाकीत