बातम्या
संजीवन विद्यालय व पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
By nisha patil - 1/15/2024 6:30:15 PM
Share This News:
पन्हाळा येथील संजीवन विद्यालय व संजीवन पब्लिक स्कूल या दोन्ही प्रशालांचे स्नेहसंमेलन "मातृ देवो भव" या अभिनव संकल्पनेवर सादर करण्यात आले. या संकल्पनेतून स्त्री शक्तीची विविध रूपे गीत,संगीत नृत्याविष्कार व नाट्याद्वारे उलगडून दाखवणारी विविध गुणदर्शनाची मेजवानी रसिक-पालकांना येथील विद्यार्थ्यानी दिली. अद्ययावत ध्वनी, प्रकाश यंत्रणेने गजबजलेल्या उत्साहवर्धक कार्यक्रमाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली.
यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मातांचे पाद्यपूजन करून आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तसेच या सोहळ्यातून भारतातील विविध क्षेत्रात स्पृहणीय कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
सुमारे अडीच तास सर्व उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवणार्या या सोहळ्याचा शुभारंभ दोन्ही प्रशालांचे आदर्श विद्यार्थ्यी श्रावणी साळुंखे व पारस जाधव या पालकांच्या व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संजीवनच्या आपल्या पाल्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे असे कृतज्ञतापूर्ण उद्गार पालकांनी काढले. या प्रसंगी संजीवन समूहाचे अध्यक्ष पी.आर. भोसले,
सहसचिव एन. आर. भोसले, संचालक आर. डी. कांडगावकर, श्रीकांत घाटगे, आर.आर. भोसले, किरण साळोखे, क्रीडा संचालक सौरभ भोसले संजीवन विद्यालयाचे प्राचार्य महेश पाटील,पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य बी.आर. बेलेकर, डे स्कूल चे उपप्राचार्य पी.एन.पाटील,छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या शिल्पा पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी-पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गांजवे ,महेंद्र कुलकर्णी,व विद्या साळोखे यांनी केले.
संजीवन विद्यालय व पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
|