बातम्या
सन्मती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर
By nisha patil - 8/21/2023 4:54:04 AM
Share This News:
इचलकरंजी/प्रतिनिधी- येथील सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेच्या कोल्हापूर शाखेच्या नूतन वास्तू स्थलांतर सोहळा जगद्गुरु जगद्भूषण स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व चेअरमन सुनिल पाटील, व्हाईस चेअरमन एम.के. कांबळे, व्यवस्थापकिय मंडळ चेअरमन अजित कोईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बँकेचे हितचिंतक सौ. व श्री. आप्पासाहेब कुडचे या उभयतांच्या हस्ते महास्वामींचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी महास्वामीजींनी बँकेच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत अशीच प्रगती सदोदित होत राहो असे आशिर्वाद दिले.
यावेळी चेअरमन सुनिल पाटील यांनी, 27 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या बँकेने 13 शाखेद्वारे सर्व सामान्य ग्राहकांना अत्याधुनिक डीजीटल सेवा सुविधा, जेष्ठ नागरिकांना डोअर स्टेप सुविधा यासह आरटीजीएस, एनईएफटी, मायक्रो फायनान्स यासह अत्याधुनिक सुविधा पुरवित आहे. बँकेच्या कोल्हापूर शाखेच्या एकूण ठेवी 25 कोटी असून 9 कोटी 47 लाख कर्जे असा एकूण व्यवसाय 35 कोटी आहे. आजअखेर बँकेच्या एकूण ठेवी 346 कोटी, 226 कोटी कर्ज, आणि बँकेची गुंतवणूक 131 कोटी इतकी असल्याचे सांगितले.याप्रसंगी संचालक प्रा. ए. जे. पाटील, संजय चौगुले, आण्णासो मुरचिट्टे, डॉ. अरुण कुलकर्णी, सी. ए. पाटील, डॉ. आप्पासो होसकल्ले, सौ. वसुंधरा कुडचे, सीईओ अशोक पाटील, असि. सीईओ समीर मैंदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार, डे. जनरल मॅनेजर सौ. हेमलता पाटील, ऑडिट मॅनेजर अनंत पुजारी, शाखाधिकारी संतोष पाटील यांच्यासह खातेदार, शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सन्मती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर
|