बातम्या

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

Santre is a very beneficial fruit for health and skin


By nisha patil - 1/4/2024 7:20:50 AM
Share This News:



 संत्री हे फळ आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. संत्र्याच्या नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर होतात. म्हणूनच आपल्याकडे आजारी माणसाला संत्री, मोसंबी खाण्यासाठी दिले जाते. परंतु, फक्त आजारी पडल्यासच नव्हे तर चांगले असतानाही संत्र्याचे सेवन केले पाहिजे.

संत्र्यामध्ये हृदयरोग्यांसाठी फायदेशीर असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि क जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात आढळून येते. यामुळे हृदयरोग होण्यास कारणीभूत असणारा रक्तदाबही नियंत्रित राहतो. संत्र्याच्या सालीत असलेल्या अल्कालॉइड सिनेफ्रीन नावाच्या घटकामुळे लिव्हर एलडीएल म्हणजेच अनावश्यक कॉलेस्टरॉलची अधिक निर्मिती होत नाही. निरोगी हृदयासाठी संत्रे खूप आवश्यक आहे. संत्रे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यासोबतच मलावरोधापासूनही सुटका होते.

संत्र्यामधील क जीवनसत्त्व बाह्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्यामध्ये साहाय्यक ठरते. संत्र्यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही बळकट होते. संत्र्याचा रस नियमित पिल्याने मुतखड्याचा धोका कमी होतो. त्वचेसाठीही संत्रे खूप फायदेशीर आहे. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेला इजा होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. तज्ज्ञांच्या मते, क जीवनसत्त्व भरपूर असलेल्या फळांचे सेवन केल्याने विषाणूजन्य संसर्गापासून बचाव होतो. संत्र्यामध्ये असलेल्या पॉलिफिनॉल्समुळे या संसर्गापासून बचाव होतो.


‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ