बातम्या

पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद  

Sarai criminals jailed on police record


By nisha patil - 2/6/2023 3:59:14 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  हद्दपार असतानासुध्दा अपघातबाबतचा वाद मिटविल्याच्या रागातून घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यासह घरावर दगडफेक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी फरारी पोलिस रेकॉर्डवरी सराईत गुन्हेगार सलमान राजू नदाफ  याला अटक केली आहे. फरार असलेला सलमान नदाफ याला गावभाग पोलिसांनी  काल रात्री अटक केली असून,  त्याला आज नायायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला  ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सलमान नदाफ याने दोन साथीदारांसह 22 मे रोजी गावभागातील नरसोबा कट्टा परिसरात राहणार्‍या सुनिल भाऊसो लंगोटे याच्या घरात शिरून चार महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताचा वाद मिटवल्याचा जाब विचारत, सलमान याने कोयता उगारत सुनिल याला जीवे मारण्याची धमकी देऊन  कुटुंबियांना शिवीगाळ केली. तर सलमान याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी लंगोटे याच्या घरावर दगडफेक केल्याने  प्रापंचित साहित्याचे नुकसानदेखील केल आहे . या प्रकरणी दहशत माजविण्यासह शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लंगोटे याच्या फिर्यादीवरुन दोन साथीदारांसह सलमान नदाफ अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेला सलमान नदाफ याला गावभाग पोलिसांनी  काल रात्री अटक केली असून त्याला आज नायायालयात हजर केले असता,  न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक राजू ताशिलदर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर कदम, बाजीराव पवार ,अमित कदम, आदित्य दूडगे यांनी केली आहे.


पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद