बातम्या

बॅकलेस ब्लाउसमध्ये साराच्या किलर पोज : कमेंट्सचा वर्षाव

Saras Killer Pose in Backless BlouseComments Outpour


By nisha patil - 9/7/2024 6:34:40 PM
Share This News:



  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर आपले फोटो ती पोस्ट करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यामध्ये सारा पांरपरीक लेहंगामध्ये फेस्टिव्हल लूकमध्ये दिसत आहे.   सारा या ट्रेडिशनल लूक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. बॅकलेस ब्लाउस आणि हातात सुंदर बांगड्यांसह तिने गळ्यात डिझायनर नेकलेस परिधान केले आहे. सारा अली खानवर हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.ग्लॉसी लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ यासोबत साराने केसांना थोडा मॅसी लूक दिला आहे.साराने फोटोसह काही कॅप्शन देण्याऐवजी काही इमोजीस् पोस्ट केल्या आहेत.सारा अली खानने हे फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून लाइक्स कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.सारा अली खानचा हा लूक अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधी समारंभासाठी असावा अशी चर्चा होती.सारा अली खानने अल्पावधीत आपली छाप सोडली आहे. सुशांत सिंह राजपूत सोबतची भूमिका असलेल्या 'केदारनाथ'या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


बॅकलेस ब्लाउसमध्ये साराच्या किलर पोज : कमेंट्सचा वर्षाव