बातम्या

सारथी, बार्टी, महाज्योती परीक्षेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा गोंधळ

Sarathi Barti Mahajyoti exam again student confusion


By neeta - 10/1/2024 2:25:26 PM
Share This News:



 

कोल्हापुर : सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेला सील  नव्हतं म्हणून विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील परीक्षा केंद्रावर जोरदार गोंधळ घातला आहे.
     समोर आलेल्या माहितीनुसार, आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ  येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी  फेर परीक्षा घेण्यात आली.  यावेळी परीक्षेत  झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तसेच प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे. पुन्हा एकदा पेपर फुटल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात गोंधळ घालायला सुरुवात केली.आणि सार्वजनिकरित्या बहिष्कार टाकत परीक्षेवर निषेध नोंदवला आहे. यामुळे  पुन्हा एकदा परीक्षा नियंत्रणाचा व सारथी परीक्षेचा गोंधळ चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळालं.  
      यावेळी युवा सेनेचे नेते मंजीत माने व यांच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन परीक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली  असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचे  मंजीत माने यांनी आरोप केला आहे. सारथी, बार्टी, महाज्योती मुलांवर असा अन्याय होत असेल, पेपर फुटून जर मुलांच्या आयुष्याशी खेळणार असाल तर युवा सेना  तुम्हाला रस्त्यावर फिरवून देणार नाही असा कडक  इशारा  यावेळी युवा सेनेचे मंजित माने यांनी दिला.


सारथी, बार्टी, महाज्योती परीक्षेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा गोंधळ