बातम्या
कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
By nisha patil - 2/11/2023 6:30:06 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांचे कार्य हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसच्या सर्व विद्यार्थिनींनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये राष्ट्रीय एकता शपथ आणि राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन ही करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.धीरज शिंदे आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख अनिल कुंभार,सौ.एकता जाधव, सौ. सोनाली बोरगांवकर-देशपांडे, सौ.मनिषा गवळी, डॉ. सविता भोसले, डॉ.प्रियंका कुंभार, डॉ राजश्री मालेकर,सौ.शितल आंबी तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
|