बातम्या
८ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदांची सोडत
By nisha patil - 2/4/2025 3:24:06 PM
Share This News:
८ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदांची सोडत
1026 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर होणार सोडत
कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंचपदाची सोडत ८ एप्रिलला होणार आहे. जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता हि आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे .अशी अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलीय.यामध्ये शाहुवाडी तालुक्यातील 111 ग ग्रामपंचायतीचा समावेश आहे.तर पन्हाळा तालुक्यातील 106, हातकणंगले 118, शिरोळ 29,करवीर ८३ गगनबाडा 98 , राधानगरी 61,कागल 52, भुदरगड 73,आजरा 97, गडहिंग्लज 89, चंदगड 109 अशा एकूण 1026 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणावर सोडत होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर किंवा प्रशासकीय इमारतींमध्ये आठ एप्रिलला ही सोडत होणार आहे
८ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदांची सोडत
|