राजकीय

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिलरोलर पूजन उत्साहात

Sarsenapati Santaji Ghorpade in sugar factory miller roller in excitement


By Administrator -
Share This News:



सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे दहाव्या गळीत हंगामासाठीचे मिलरोलर पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.  या हंगामात एकूण आठ लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.        
              
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष श्री. मुश्रीफ म्हणाले, यावर्षी सरासरी पाऊसमान चांगले असून कारखान्याची हंगामपूर्व कामे वेळेत करून आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
           
या हंगामामध्ये २३ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पामधून १८३ दिवसांत आजअखेर एकूण नऊ  कोटी, ६० लाख, ८८ हजार, ९३० युनिट निर्मिती झाली. आजपर्यंत सहा कोटी, ८६ लाख, १०००  युनिट वीज एमएसईबीला  निर्यात झाली आहे. 
              
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, २०२२-२३ या आर्थिक वर्षात इथेनॉलचे एक कोटी, ३१ लाख, ३९  हजार लिटर इतके उच्चांकी उत्पादन झाले आहे. तेल कंपन्यांना करारानुसार आजअखेर ६० लाख लिटर  पुरवठा झाला आहे. आजपर्यंत ८५  लाख, ५६ हजार लिटर्स इतके इथेनॉल व नऊ लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट  एवढे उत्पादन झाले आहे. उर्वरित १५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन लवकरच पूर्ण होईल.
            
"इथेनॉल प्रकल्पाची विस्तारवाढ प्रगतीपथावर......."
श्री. मुश्रीफ म्हणाले, डिस्टिलरीच्या विस्तारवाढीचे काम गतीने सुरू आहे. येत्या हंगामात हा प्रकल्प दररोज ९५  हजार लिटर निर्मिती इतक्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन, अडीच कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे.  
          
यावेळी जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांच्यासह अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.


Sarsenapati Santaji Ghorpade in sugar factory miller roller in excitement