बातम्या
साताराच्या आदितीने पटकावला 'अर्जुन पुरस्कार'
By nisha patil - 12/21/2023 1:46:15 PM
Share This News:
साताराच्या आदितीने पटकावला 'अर्जुन पुरस्कार'
सातारा : सातारा तालुक्यातील शेडेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळवणारी जिल्ह्यातील तसेच जागतिक पातळीवर लौकिक मिळविणारी साताऱ्याची पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडलीच आहे तसेच सातारा जिल्ह्याचे नाव साता समुद्रच्या पलीकडे ही तिने मोठं केला आहे.
आदित्य हिना अत्यंत कमी वयात जागतिक पात्येवर सर्वोच्च कामगिरी करणारे खेळाडू ठरली आहे. 2023 मध्ये जागतिक स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजी मध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. जागतिक करंडक स्पर्धेत 2006 नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वात लहान वयाची खेळाडू होती. भारताला चौदा वर्षानंतर वर्ल्ड कप मध्ये 720 पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिले आहेत.
साताराच्या आदितीने पटकावला 'अर्जुन पुरस्कार'
|