बातम्या

२०२३ पर्यंत दीड कोटी चौरस फूट नवीन बांधकाम : सतेज पाटील

Satej Patil 2023


By nisha patil - 12/22/2023 4:54:08 PM
Share This News:



२०२३ पर्यंत दीड कोटी चौरस फूट नवीन बांधकाम : सतेज पाटील

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात 2023 पर्यंत दीड कोटी चौरस फुटाची नवीन बांधकामे होणार आहेत. त्यामुळे विविध सुविधांमुळे ताण येण्याची शक्यता असून पाणी, ड्रेनेज, वीज या पायाभूत सुविधांचा संभाव्य नियोजनासाठी आराखडा बनवण्याची सूचना महापालिकेला केल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
   

या बांधकामांमधून शहरातच्या विकासाला चालना मिळणार आहे. वाढत्या मिळकतींना सुविधा देण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज असल्याने त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाला आतापासूनच कामाला लागावे यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. दोन-तीन महिने सतत अभ्यास करून संभाव्य आराखडा बनवण्यात येणार आहे.
   

आमदार पाटील म्हणाले, सध्या पुनर्विकासाचे प्रकल्प वाढत आहेत. त्या व अन्य प्रकल्पांसाठी 90 लाख चौरस फुटांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. तसेच येत्या दोन महिन्यात आणखी 50 लाख चौरस फुटांची बांधकाम परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी वर्षात शहरात बांधकाम क्षेत्राला मोठी चालणार  मिळणार आहे. 
त्यातून साहित्य विक्री कामगारांना रोजगार वाढवून मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. शहराच्या विकासासाठी ही बाब चांगली असली तरी आता शहरवासीयांना पाणी, ड्रेनेज, वीजपुरवठा या दिल्या जाणाऱ्या सुविधांवर ताणही येणार आहे. ही स्थिती लक्षात ठेवून महापालिकेच्या प्रशासक के. म्हणजे लक्ष्मी यांना भविष्यातील नियोजन करण्यास सांगितले आहे.
    आराखड्याचे ढोबळ चित्र स्पष्ट करताना ते म्हणाले, शहरात 36 पाण्याचे झोन आहेत, त्याप्रमाणे झोन आहेत. कोणत्या विभागात सध्याची लोकसंख्या व तिथे विकास झाल्यानंतर वाढणारी लोकसंख्या यांचा अभ्यास करून त्यासाठी किती पाणी तसेच ड्रेनेज लाईन विहिरीची गरज असेल याचे चित्र तयार केले जाईल त्यानुसार विविध विभागांना आतापासून काम करावे लागणार आहेत.असे ते म्हणाले.


२०२३ पर्यंत दीड कोटी चौरस फूट नवीन बांधकाम : सतेज पाटील