बातम्या

सतेज पाटील कोणत्याही आव्हानांना घाबरत नाही

Satej Patil is not afraid of any challenge


By nisha patil - 3/13/2024 11:13:52 PM
Share This News:



सतेज पाटील कोणत्याही आव्हानांना घाबरत नाही

अर्धवट माहिती घेऊन बोलणार्याची कीव वाटते -सतेज पाटील

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी, कोल्हापूर : “खासदार धनंजय महाडिक यांनी थेट पाइपलाइन योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे, त्याचे स्वागतच करतो. त्यांनी चौकशीची मागणी करण्यापूर्वी थेट पाइपलाइन योजना आणि अमृत योजनेत समाविष्ठ कामांची माहिती घ्यायला हवी होती. कोणत्या योजनेत कोणती कामे आहेत यासंबंधीचा पूर्ण अभ्यास करायला हवा होता. मात्र कोणतीही माहिती न घेता चौकशीची करा म्हणणे म्हणजे खासदार महाडिकांच्या बुद्धीची कीव वाटते.’असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी लगाविला.
‘कोल्हापूरच्या लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांच्या गळयात घातली असा जो आरोप महाडिकांनी केला आहे, हेच आरोप त्यांनी तीन महिन्यापूर्वी केले असते तर त्यांना योग्य समर्पक उत्तर दिले असते. सतेज पाटील हा कोणत्याही आव्हानांना घाबरत नाही. महाडिकांनी माझ्यावर जरुर टीका करावी, पण पाइपलाइन योजना बदनाम करू नये. ’असे खुले चॅलेंजही त्यांनी दिले.

थेट पाइपलाइन योजनेच्या कामावरुन खासदार महाडिक यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले, ’‘२०१४ ते २०१९ या कालावधीत ते पहिल्यांदा खासदार होते. त्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पाइपलाइन योजनेसंबंधी आढावा बैठक घेतली हे कधी निदर्शनास आले नाही. खासदारकीची दुसरी टर्म भूषविणाऱ्या महाडिकांनी पाइपलाइन योजनेचा पूर्ण अभ्यास केला नाही. माहिती घेतली नाही. थेट पाइपलाइन योजनेंतर्गत धरणातून पुईखडीपर्यत पाणी आणण्याच्या कामाचा समावेश आहे. शहरातंर्गत पाणी पुरवठा संबंधीची कामे अमृत योजनेत समाविष्ठ आहेत. अमृत योजनेत शहरातील बारा टाकी बांधणे प्रस्तावित आहे. दरम्यान अमृत योजना ठेका हा सांगलीचे मंत्री सुरेश खाडे यांच्या भावाकडे आहे. त्यांनी काम पूर्ण करण्यास विलंब केल्यामुळे महापालिकेने त्यांना नऊ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकाराची चौकशी महाडिकांकडून व्हायला हवी. कारण त्या ठेकेदाराने दंड माफ करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. भाजपाचा ठेकेदार आहे म्हणून दंड माफ होणार की वसूर होणार ?’अशा शब्दांत पाटील यांनी चिमटा काढला.

२०१४ ते २०१९ या कालावधीत ८८७ दिवस थेट पाइपलाइन योजनेचे काम ठप्प होते. यावेळी सत्ता कोणाची होती. जिल्हयाचे मंत्री कोण होते हे सुद्धा महाडिकांनी तपासून पाहावे. आरोप करुन त्यांना भाजपातील कोणाला अडचणीत आणायचे आहे का ?अशी शंका येते.’असेही पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडे कोणताही विकासात्मक मुद्दा नाही. आम्ही मात्र केलेल्या विकासकामांवर मते मागणार आहोत. थेट पाइपलाइन योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला. आम्ही त्या योजनेच्या नावाखाली शहरवासियांना मते मागणार आहोत. नागरिक त्याला प्रतिसाद देतील.’असेही पाटील म्हणाले.
 

‘महाडिकांच्या आरोपामुळे थेट पाइपलाइन योजनेचे काम माझ्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सी आणि डी वॉर्ड वगळता शहरातील बहुतांश भागात थेट पाइपलाइन योजनचे पाणी वितरित होते. महाडिक ज्या रुईकर कॉलनी भागात राहतात त्या भागाात गेली तीन-चार महिने थेट पाइपलाइन योजनेतील पाणी पुरवठा होत आहे. योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करू. ज्या भागात पाणी पुरवठा होताना अडचणी उद्भवत आहेत त्या दूर करण्याचे काम अधिकारी करत आहेत.’ पत्रकार परिषदेला आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.


सतेज पाटील कोणत्याही आव्हानांना घाबरत नाही