बातम्या

महाडीकांनी आता पुन्हा सतेज पाटील यांना डिवचले

Satej Patil was once again defeated by Mahadika


By nisha patil - 3/13/2024 4:34:03 PM
Share This News:



महाडीकांनी आता पुन्हा सतेज पाटील यांना डिवचले

ते निवडणूक स्वतः का लढत नाहीत -खा.महाडिक

 कोल्हापूर : "लोकसभा निवडणूक लढविण्याची धमक काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये नाही. म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली. ते स्वतः का निवडणूक लढवत नाहीत." असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला. प्रत्येक वेळी भावनिक वातावरण निर्माण करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची ही त्यांची नीती आता जनतेला ठाऊक झाले आहे असा टोलाही महाडिक यांनी लगावला.
खासदार महाडिक यांनी बुधवारी तेरा मार्च रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह पुईखडी येथील थेट पाईपलाईन योजनेच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीची अनुषंगाने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. याप्रसंगी कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवरून महायुतीतल्या घडामोडी संदर्भात बोलताना खासदार महाडिक म्हणाले, 'कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा महायुती अंतर्गत शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. दरम्यान महायुतीकडून दोन्ही जागी संदर्भात जी नावे समोर येत आहेत ती आम्हाला माध्यमातून समजत आहेत. महायुतीत लोकसभेच्या जागे संदर्भात जो निर्णय होईल, महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून आणू. संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. जागा शिंदे गटाकडे आहे. आम्ही पक्षाचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाने जर समरजीतसिंह घाटगे किंवा मला निवडणूक लढवायला सांगितले तर आम्ही मैदानात उतरू. राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट मिळाले तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील सक्षम उमेदवार आहेत
 दिलेला शब्द पालटणारा नेता म्हणजे सतेज पाटील."असा टोमणाही खासदार महाडिक यांनी लगावला. विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोधाची प्रक्रिया सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यामध्ये विनय कोरे, संजय डी पाटील, सतेज पाटील अशी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी उतरायचं नाही असे ठरले होते. तसा त्यांनी शब्दही दिला होता. मात्र त्यांनी तो शब्द पाळला नाही. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी सतेज पाटील यांचे खरे रूप जनतेसमोर आणले. प्रत्येक वेळी भावनिक भाषण करून लोकांची दिशाभूल करायची ही सतेज पाटलांची निती आहे. मात्र या निवडणुकीत जनता त्यांना फसणार नाही. मुळात त्यांनी स्वतः निवडणूक का लढविले नाही ?त्यांच्यात लोकसभा निवडणूक लढविण्याची धमक नाही का ?" असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला. काँग्रेसकडून बाजीराव खाडे निवडणुकीसाठी इच्छुक होते. गेली चार वर्षे ते निवडणुकीची तयारी करत होते. चेतन नरके गेली दोन वर्ष लोकसभेसाठी प्रयत्नशील होते. मुळात ही जागा महाविकास आघाडी अंतर्गत ठाकरे गटाकडे होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेकडून ही जागा घेतली. महाराजांना लोकसभेसाठी उभे करण्यातही काँग्रेसच्या नेत्यांचे षड्यंत्र दिसते असेही महाडिक म्हणाले.


महाडीकांनी आता पुन्हा सतेज पाटील यांना डिवचले